Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
Sau. Meentai Thackeray Blood Bank
 
Advanced Diploma Course in Blood Bank Technology and Management

Course Highlights

Name of Course : Advanced Diploma Course in Blood Bank Technology and Management
Recognizing body : Maharahtra State Board of Technical Education (MSBTE)
  State Blood Tranfusion Council (SBTC)
Duration of the Course : One and half year
Pattern : Semister
Type : Part-Time
Eligibility : Bsc.MLT / Bsc / PGDMLT / MBBS / B.Pharm of the recognized university
with more than 50% aggegate marks in the final examination.
Student per year : 20
Contact No : 28797586 / 87

अ‍ॅडव्हान्सड्‍ डिप्लोमा इन ब्लडबँक टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट

प्रबोधन गोरेगाव संचालित मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी येत्या शैक्षणिक वर्षापासून "अ‍ॅडव्हान्सड्‍ डिप्लोमा इन ब्लडबँक टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट" हा दिड वर्षाचा अर्धवेळ अभ्यासक्रम सुरू करीत आहे. या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता मिळाली आहे तसेच राज्य रक्‍त संक्रमण परिषदेचीही मान्यता मिळाली आहे . अशाप्रकारचा नवीन अभ्यासक्रम सध्या तरी मुंबईत प्रथमच सुरु होत आहे.

रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान अथवा मलेरिया, डेंग्यु, कर्करोग अशासारख्या आजारांत रक्‍त संक्रमण करणे अत्यंत गरजेचे असते. बहुतेक मोठ्या रुग्णालयात त्यांच्या रक्‍तपेढी असतात. परंतु लहान रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना देण्यासाठीचे रक्‍त शहरांत असलेल्या रक्‍तपेढीतून घ्यावे लागते.

मुंबई शहरात व उपनगरांत एकंदर १५२ रक्‍तपेढी आहेत. मोठ्या रुग्णालयातील असो वा अन्य रक्‍तपेढी त्यामध्ये काम करण्यासाठी खास प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची सतत गरज असते व ह्या कर्मचाऱ्यांना अन्न व औषधी प्रशासनाचीही मान्यता आवश्यक असते. अशा प्रकारच्या तांत्रिक कर्मचा-यांची नेहमीच कमतरता सर्व रक्‍तपेढींना भासत असते.

रक्‍त्पेढीत काम करण्यासाठी विज्ञानशाखेचे पदवीधर (जीव व रसायन) डी.एम.एल.टी, सी.एम.एल.टी या अभ्यास क्रमाच्या परीक्षा उत्‍तीर्ण झालेले असावे लागतात. परंतु या विद्यार्थ्यांना रक्‍तपेढी, रक्‍तसंक्रमण, रक्‍तपेढी व्यवस्थापन या विषयी फारसे ज्ञान दिले जात नाही व त्यामुळे त्यांना अन्न व औषधी प्रशासनाची मन्यता मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होतात.

सुरवातीला २० विद्यार्थी घेण्याची परवानगी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना रक्‍तपेढी, रक्‍तदान, रक्‍तघटक व रक्‍तसंक्रमण या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी असे मार्गदर्शक तर असतीलच त्याचबरोबर अध्यायींसाठी रक्‍तपेढी व ‘रक्‍त’ या विषयावरची पुस्तके असलेले वाचनालय, रक्‍तपेढीतील प्रत्यक्ष काम कसे चालते, त्यात कोणते तंत्र वापरले जाते, कोणती यंत्रसामग्री वापरली जाते तसेच रक्‍तपेढीचे एकूण व्यवस्थापन कसे करावे याचा कार्यानुभव पण घेता येणार आहे. जेणेकरून १.५ वर्षाच्या या अभ्यासक्रमाची यशस्वी पूर्तता केल्यावर बाहेर पडणारा विद्यार्थी देशातील कोणत्याही रक्‍तपेढीत अगदी पहिल्या दिवसापासून काम करू शकेल. देशामध्ये सरकारी व खासगी रक्‍त्पेढ्यांची येणाऱ्या काळात होणारी वाढ लक्षात घेता हा अभ्यासक्रम तरुणांना चांगलाच लाभदायक ठरु शकेल अशी खात्री आहे. या अभ्यासक्रमासाठी मुंबई महानगरपालिकेने मीनाताई ठाकरे रक्‍तपेढीस खास अतिरिक्‍त जागा उपलब्ध करुन दिली आ
हे.
 
© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.