१९७२ साली कला, क्रीडा, ज्ञान व समाजसेवा या सुत्रांचा स्वीकार करीत ’प्रबोधन गोरेगाव’ संस्थेची स्थापना झाली. आजवरच्या वाटचालीत प्रबोधनने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताना मुंबई व महाराष्ट्रात आपल्या कार्याचा अनोखा ठसा उमटविला. प्रत्येक वेळी नवीन व आगळा वेगळा उपक्रम देण्याचा प्रयत्न संस्थेने केला व त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले. आज संस्थेचे प्रबोधन क्रीडाभवन, ओझोन जलतरण तलाव व एक्टीव्हीटी सेंटर, जॉगर्स पार्क, स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी, प्रबोधन रक्‍तवाहिनी, प्रबोधनकार ठाकरे वाचनालय व अभ्यासिका, प्रबोधन औषधपेढी यासारखे अनेक उपक्रम यशस्वीरित्या सुरू असून पश्चिम उपनगरवासीयांना या सुविधांचा सातत्याने लाभ होत आहे.

मुलभूत उद्दिष्टे
धर्म, पंथ, भाषा अगर जातीचा विचार न करता समाजातील सर्व थरातील लोकांची सांस्कृतिक, शारिरीक, शैक्षणिक व बौद्धिक प्रगती साधणे.
यांकरीता :-
क्र.   विवेचन
१.   शारिरीक उन्नती घडवून आणण्याकरीता क्रिडासामने, क्रिडामहोत्सव आयोजित करणे व व्यायामशाळा स्थापणे.
२.   गरजू , होतकरू शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
३.   अर्थिक दृष्ट्‍या दुर्बल व्यक्‍तींना शस्त्रक्रिया अथवा औषधोपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
४.   ग्रंथ व वाङमय विषयक चर्चा घडवून आणणे आणि लेखन व वक्‍तृत्वाच्या स्पर्धा आयोजित करणे.
५.   विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करुन देणे आणि संदर्भ ग्रंथालये स्थापणे व चालविणे.
६.   नाट्य, संगीत व नृत्य इत्यादी कलांना उत्तेजन देण्याकरीता कार्यक्रम आयोजित करणे.
७.   व्याख्याने व्याख्यानमाला आयोजित करणे.
८.   संमेलने, प्रदर्शने व शैक्षणिक सहली आयोजित करणे.
१९७२ पासून सदर उद्दिष्टांना नजरेसमोर ठेवून संस्थेची अविरत वाटचाल सुरू आहे. अनेक लोकोपयोगी प्रकल्प उभे राहिले आहेत व अजूनही अनेक प्रकल्प उभारण्याचा मानस आहे.
प्रबोधनच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल सर्वांना सुखकारक होवो व जनसेवेच्या मार्गात संस्थेला असेच उत्तरोत्तर यश मिळत जावो हीच प्रार्थना.
 
 
 
 

© 2009 Prabodhan Goregaon Trust - Mumbai. All rights and content reserved. Site Developed by Pristine Web Developers