| |
| |
| |
ज्ञानामुळे माणूस घडतो. ज्ञानामुळे घडलेला माणूस समाज घडवितो. माणसं घडविणारे, माणसांच्या विचारांना - बुद्धीला चालना देणारे कार्यक्रम, उपक्रम, प्रबोधन अगदी पहिल्यापासून राबवित आहे. गिरगाव, दादर, पार्ल्याच्या नागरिकांप्रमाणेच गोरेगावकरांनाही थोरामोठ्यांचे विचार ऎकण्याची संधी मिळावी या आग्रहातून प्रबोधनने ’प्रबोधन व्याख्यानमाला’ सुरु केली. सतत अकरा वर्षे या व्याख्यानमालेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील ज्ञानी, विद्वानांनी उपस्थिती लावली. नवीन विचार देणार्या या व्याख्यानमालेला सुज्ञ गोरेगावकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. पूढे दूरदर्शनने लोकांना घराच्या चार भिंतीत जखडून टाकलं आणि ’चार माणसांसमोर वक्त्यांना बोलायला लावण्यात अर्थ नाही’, असा विचार करुन ’प्रबोधन व्याख्यानमाला’ थांबविण्यात आली. मात्र माणसांची ज्ञानार्जनाची भूक थांबणारी नाही. थोरांचे विचार, मोठ्यांची कामं याबद्दल जाणून घ्यायचं हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव. गोरेगावकरांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रबोधनने २००० साली ८ जानेवारीला प्रबोधन व्यासपीठाची सुरुवात केली. संस्थेचे संस्थापक सर्वश्री सुभाष देसाई व वसंत तावडे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रत्येक मान्यवराच्या व्याख्यानाच्या शेवटी रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रश्नोत्तरे करुन प्रत्येक व्याख्यानास वेगळीच रंगत आणली. |
|
| |
 |
|
| |
२००० साली प्रबोधन व्यासपीठात प्रसिद्ध अभिनेते श्री. प्रभाकर पणशीकर, प्रसिद्ध सहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध निवृत्त सनदी अधिकारी व लेखक श्री. अविनाश धर्माधिकारी, प्रतिभावंत कवी अशोक नायगांवकर, अशोक बागवे, नलेश पाटील, अरुण म्हात्रे तसेच प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व समीक्षक श्री. चंद्रशेखर टिळक, विवेकानंदांवरील सखोल अभ्यासक व फर्डे वक्ते श्री. वसंत पोतदार या सुप्रसिद्ध व्यक्तिंनी व्यासपीठाचे पहिलेच वर्ष गाजविले. |
|
| |
 |
|
| |
२००१ साली सुप्रसिद्ध छायाचित्रकार श्री. श्रीकांत मलुष्टे, सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अरविंद वझे, मराठीतील मान्यवर साहित्यिक श्री. रवींद्र पिंगे, ख्यातनाम प्रवचनकार श्री. सच्चिदानंद शेवडे, ज्योतिष व खगोलशास्त्राचे जाणकार श्री. दा. कृ. सोमण, विद्वत्ताप्रचुर श्री. विद्याधर घैसास, गायिका वीणा वायकुळ, कर्नल दामोदर कुलकर्णी, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, प्रख्यात हृदयशस्त्रक्रियाविशारद डॉ. नीतू मांडके यांच्या व्याख्यानांनी प्रबोधन व्यासपीठाचा सोहळा संस्मरणीय बनविला.
|
|
| |
 |
|
| |
२००२ साली आयोजित प्रबोधन व्यासपीठात कॅप्टन आनंद जयराम बोडस, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. विजय पाटकर, सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. गिरीश वासुदेव, सरोदवादक श्री. विवेक जोशी, सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख, विंग कमांडर श्री. रविंद्र पारसनीस, आयुर्वेदाचार्य श्री. विक्रांत जाधव, कैलास सरोवर व मानसरोवर भ्रमण करुन त्यांच्या पारदर्शिकांद्वारे प्रत्यक्षदर्शनाचा अनुभव देणारे श्री. परब, ज्येष्ठ रंगकर्मी श्री. मोहनदास सुखटणकर, ज्येष्ठ युद्ध पत्रकार श्री. मिलिंद गाडगीळ, पाटकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, डॉ. राम आंबर्डेकर, मुंबई सकाळचे माजी संपादक श्री. राधाकृष्ण नार्वेकर या सर्वांच्या व्याख्यानांद्वारे गोरेगावकरांसाठी एक दुर्मिळ योगच उपलब्ध झाला. |
|
| |
 |
|
| |
२००३ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर नीळकंठ नवरे, विजय तारी व ऋणाली तारी, एस. एन. डी. टी. च्या विभागप्रमुख डॉ. सई देशपांडे, पंडित शशांक कट्टी व डॉ. हिमालय पंत, सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. सुभाष भेंडे, श्री. ह. मो. मराठे, आयुर्वेद भूषण व पंचकर्मतज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव, ज्ञानेश्वरांचे अभ्यासक श्री. वामन देशपांडे, श्री. दाजी पणशीकर, नवशक्ति संपादक श्री. प्रकाश कुलकर्णी या दिग्गजांच्या व्याख्यानांनी उपस्थित रसिकश्रोत्यांना समाधानी केले. |
|
| |
 |
|
| |
२००४ साली व्यासपीठाअंतर्गत विविध व्याख्यानांमधून डॉ. बाबुराव पालव, प्रसिद्ध लेखिका व नाट्य समीक्षिका डॉ. चारूशीला ओक, प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. अरविंद गोडबोले, मराठी विज्ञान परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप हेर्लेकर, सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ज्ञ श्री. द. कृ. सोमण, सुप्रसिद्ध व्याख्याती क्रांतीगीता महाबळ, सुप्रसिद्ध ज्योतीषी श्री. विद्याधर घैसास, सुप्रसिद्ध वास्तुशास्त्र तज्ज्ञ श्री. अरविंद वझे, कयदेतज्ज्ञ किशोर जावळे, ज्येष्ठ क्रीडा लेखक श्री. द्वारकानाथ संझगिरी, प्राध्यापक रमेश खटावकर सारख्या नामवंत व तज्ज्ञ मंडळींनी उपस्थित श्रोतृवर्गासमोर स्वत:चे विचार व अनुभव कथन केले. |
|
| |
 |
|
| |
२००५ साली आयोजित विविध व्याख्यानांमधून एस. एन. डी. टी. च्या माजी प्राचार्या डॉ. शालिनी इनामदार, सुप्रसिद्ध व्याख्याती सौ. नयना वैद्य, डॉ. शेखर आंबर्डेकर, सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. सुरेश आगाशे, दैनिक सकाळचे संपादक श्री. संजीव लाटकर, सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. जयवंत छत्रे, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. सौ. विजया वाड, गोखले कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. रामदास गुजराथी, सुप्रसिद्ध श्री. दा. कृ. सोमण, ज्योतिषस्शस्त्रज्ज्ञ श्री. सुधाकर सहस्त्रबुद्धे, अर्थशास्त्रविशारद श्री. विनायक कुलकर्णी यांसारख्या ज्येष्ठ विचारवंतांच्या बोधामृताने श्रोत्यांना तृप्त केले. |
|
| |
 |
|
| |
२००६ सालच्या प्रबोधन व्यासपीठाच्या माध्यमातून श्री. प्रसाद कुलकर्णी, डॉ. संजय अपरांती, दूरदर्शन - आकाशवाणी न्यूजरीडर शिबानी जोशी आणि श्रीराम केळकर, सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रीमती क्रांतीगीता महाबळ, प्राध्यापक विसुभाऊ बापट, श्री. प्रमोद नवलकर, सुप्रसिद्ध स्वभावचित्रकार श्री. विजयराज बोधनकर, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वसंत यशवंत चव्हाण, डॉ. ऋषिकेश पंड्या, सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक श्री. दा. कृ. सोमण या विविध क्षेत्रातील नामवंत दिग्गजांनी उपस्थितांना व्याख्यानांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. |
|
| |
 |
|
| |
२००७ साली प्रबोधन व्यासपीठाच्या माध्यमातून क्रिकेट तज्ज्ञ श्री. माधव मंत्री व श्री. रविंद्र पाटकर, सुप्रसिद्ध नाटककार श्री. गंगाराम गवाणकर, प्राध्यापिका सौ. मेधा सोमण, ह. भा. श्री. श्रीधर भागवत, प्रख्यात प्लास्टिक सर्जन व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक डॉ. रविन थत्ते, सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. सुधीर सुखठणकर (मुलाखतकार श्री. अशोक बेंडखळे), श्री. संदीप सिधये, प्राध्यापिका वर्षा रेगे, महाराष्ट्र टाईम्स चे संपादक श्री. भरतकुमार राऊत या विविध क्षेत्रातील नामवंत, तज्ज्ञ मंडळींनी आपले विचार व्यक्त केले. |
|
| |
 |
|
| |
गत ८-९ वर्षांत समाज जीवनात वेगवेगळ्या प्रांतात काम करणार्या कितीतरी व्यक्तींनी प्रबोधनच्या व्यासपीठावर आपली उपस्थिती लावून सदर व्यासपीठ अधिकाधिक समृद्ध केले आहे. सदर उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील नामवंत, तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने आयोजित करुन संस्थेने सामाजिक कार्यातील आपले कर्तव्य पार पाडले असे आम्हांस वाटते. या कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांची उपस्थिती नेहमीच उत्तम राहिली आहे. व्याख्याते व विषय यांची निवड करण्यासाठी, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखक व पत्रकार श्री. शशी भालेकर यांचे सातत्याने मौलिक सहकार्य लाभले. ज्ञानदानाच्या मार्गातील प्रबोधनचा ’प्रबोधन व्यासपीठ’ उपक्रम सातत्याने रसिक श्रोत्यांना असेच दर्जेदार बोधामृत देत राहील हा विश्वास आहे. |
|
|
|
|